WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

जिल्हा परिषदेचे 3 अर्ज छाननीत अवैध


जिल्हा परिषदेचे 3 अर्ज छाननीत अवैध

पंचायत समितीचे सर्व उमेदवार ‘सेफ’

चिपळूण : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीत ९ जिल्हा परिषद गटांसाठी दाखल झालेल्या ४४ अर्जांपैकी ३ अर्ज अवैध ठरल्याने आता ४१ अर्ज वैध राहिले आहेत. तर पंचायत समितीच्या १८ गणांसाठी दाखल झालेले सर्व ७२ अर्ज वैध ठरले आहेत.

गुरुवारी (ता. २२) येथील प्रांताधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी लिगाडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीदरम्यान पेढे जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सीमा संदीप महाडिक यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे या गटात आता भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. भाजपकडून दीप्ती महाडिक, तर ठाकरे शिवसेनेकडून सौ. मानसी भोसले रिंगणात आहेत.

उमरोली जिल्हा परिषद गटात दाखल झालेल्या पाच अर्जांपैकी ठाकरे शिवसेनेकडून डमी अर्ज दाखल केलेले निवळकर यांचा अर्ज अवैध ठरल्याने या गटात चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. शिंदे सेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने योगेश खांडेकर यांनी बंडखोरी केली आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश चव्हाण, काँग्रेसकडून नंदकुमार थरवळ, भाजपकडून योगेश शिर्के व अजित थरवळ हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत बंडखोरी शांत होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना काही उमेदवारांनी अनामत रक्कमेची भरणा पावती संबंधित गणासाठी जोडल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. तसेच धनश्री शिंदे यांचा एक डमी अर्ज अवैध ठरवण्यात आला असला तरी त्यांचा दुसरा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.

छाननीनंतर अनेक गटांतील लढतींचे स्वरूप स्पष्ट झाले असून आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्याकडे तालुक्याचे राजकारण वेगाने सरकत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!