WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘आणीबाणीची ५० वर्षे’ विषयावर होणार चिंतन


‘आणीबाणीची ५० वर्षे’ विषयावर होणार चिंतन

डी.बी.जे. महाविद्यालयात ५ मार्चला युवा संसद

चिपळूण : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत राष्ट्रीय युवा संसद २०२६’ उपक्रमांतर्गत येत्या ५ मार्च २०२६ रोजी डी.बी.जे. महाविद्यालयात युवा संसद आयोजित करण्यात आली आहे. “50 Years of Emergency: Lessons for Indian Democracy – आणीबाणीची ५० वर्षे : भारतीय लोकशाहीसाठी बोध” या विषयावर ही स्पर्धा होणार असून १८ ते २५ वयोगटातील तरुणांना सहभागाची संधी देण्यात आली आहे.

या स्पर्धेतून जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांपैकी पाच जणांची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावरून तीन स्पर्धकांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड होईल. राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना लोकसभा संसद, नवी दिल्ली येथे आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी University of Mumbai तर्फे डी.बी.जे. महाविद्यालय यांची नोडल महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली आहे. हा उपक्रम Nehru Yuva Kendra यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये तसेच विविध क्षेत्रांतील युवा संघटना या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

स्पर्धेच्या निवड प्रक्रियेत शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच समाजातील प्रतिष्ठित सदस्य सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. मंगेश तांबे, सेक्रेटरी श्री. अतुल चितळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, माय भारत रत्नागिरीचे उपसंचालक श्री. अमित पुंडे तसेच जिल्ह्यातील पत्रकार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत असून जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!