चिपळुणात भाजपचा वकिलांसोबत कार्यपूर्ती आनंद!
🔷दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत
🔷जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
🔷चिपळूण तालुका वकील संघाने मानले भाजप सरकारचे आभार
चिपळूण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिपळूण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करणेबाबत वकिलांना आश्वस्त केले होते. दरम्यान सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून कॅबिनेट बैठकीत चिपळूण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याबाबतचा निर्णय करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचे वकिलांसह नागरिकांनीही स्वागत केले असून, चिपळूणमध्ये भाजपचे रत्नागिरी दक्षिणचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत आज सकाळी चिपळूण तालुका वकील संघाच्या कार्यालयात भाजप पदाधिकारी व वकिलांनी कार्यपूर्तीचा आनंद साजरा केला.

भाजप चिपळूण शहर मंडल आयोजित या कार्यक्रमात बोलताना जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी वकील संघाला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी वकील संघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीसह मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. तसेच चिपळूण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे ॲड्. पांडे यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी चिपळूण तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन सावंत, उपाध्यक्ष ॲड. पवार, खजिनदार ॲड. मिलिंद तांबे, ॲड. मनोहर यादव, ॲड. नितीन केळकर, ॲड. संजय केतकर, ॲड. संतोष आवले, ॲड. विश्वास शिगवण, ॲड. विक्रांत वाडकर, ॲड. विजय चिमणे, ॲड. चिन्मय दीक्षित, ॲड. संतोष आवले, ॲड. सुनील गुरव, ॲड. वासंती दाभोळे, ॲड. ओंकार पालांडे, ॲड. रोहन बापट, ॲड. आसिफ चिकटे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष व नगर पालिकतील गटनेते शशिकांत मोदी, महिला मोर्चा शहराध्यक्ष व चिपळूण नगरपालिकेच्या महिला बालकल्याण सभापती रसिका देवळेकर, आरोग्य सभापती शुभम पिसे, भाजपच्या शहर सरचिटणीस सारिका भावे, सरचिटणीस विनायक वरवडेकर, नगरसेविका वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, नगरसेविका शीतल रानडे, माजी नगरसेवक विजय चितळे, अभयदादा चितळे, माजी नगरसेवक आशिष खातू, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शहा, समीर टाकळे, माजी नगरसेविका स्वाती देवळेकर, रुही खेडेकर, माधुरी शिंदे, नरेंद्र बेलवलकर, अभिषेक राजपूरकर, मधुकर निमकर, उल्हास भोसले, स्वानंद रानडे, प्रणय वाडकर, प्राजक्ता टाकळे, पूजा कदम, गणपत शिंदे, गोपीनाथ शिंदे, अन्वर जबले, भाजप युवा मोर्चाचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष राहुल पवार, सुरेश म्हाडदळकर, जनार्दन पवार, शमशू घारे, दिनेश लटके, महेश नरळकर, संजय डेरवणकर आदी उपस्थित होते.










