WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार उद्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर


सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार उद्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट व भाजप कार्यकर्ता मेळावा

चिपळूण : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार बुधवार दिनांक १५ व गुरुवार दिनांक १६ रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा खेड पासून सुरू होणार असून रत्नागिरीपर्यंत ते जाणार आहेत. चिपळुणात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट देण्याबरोबरच बहादूरशेख येथील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन येथे कार्यकर्ता मेळावा व कलाकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

कार्यकर्ता मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. या दौऱ्यात विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रमोद जठार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुरत्न कार्यकारी समिती उपाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची देखील उपस्थिती असणार आहे.

राज्याची सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार हे १५ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. खेड येथे वंदे भारत एक्सप्रेसने सकाळी ९ वाजता त्यांचे आगमन होईल. यावेळी खेड भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता चिपळूण येथे ना. आशिष शेलार यांचे आगमन होईल. चिपळुनात आगमननंतर ते वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट देणार आहेत. यानंतर सकाळी ११ वाजता चिपळूण बहादुरशेखनाका येथे चिपळूण नागरी पतससंस्थेच्या सहकार भवन येथे कार्यकर्ता मेळावा व सत्कार कार्यक्रमास उपस्थिती दर्शवतील. नंतर रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या संपर्क कार्याला सदिच्छा भेट देतील.

यानंतर बुधवार दिनांक १५ रोजी दुपारी १.५० वाजता संगमेश्वरकडे रवाना होणार आहेत. दुपारी २.४० वाजता संगमेश्वर- कसबा येथील छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकास भेट देतील. दुपारी २.५५ वाजता चवे-देऊड (चाटवळवाडी) जाखडदेवी येथील कातळ शिल्पाची पाहणी करतील. नंतर दुपारी ४.१५ वाजता रत्नागिरी शहराकडे रवाना होणार आहेत. यावेळी सायंकाळी ५.१५ वाजता रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालय येथे नमन व जाखडी कलाकार संघटनांच्या वतीने सत्कार समारंभासाठी उपस्थित राहतील. सायंकाळी ६.१५ वाजता भाजप कार्यालयास सदिच्छा भेट देतील. नंतर सायंकाळी ६.४० वाजता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कबड्डी स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिनानिमित्त २६ व्या कबड्डी दिन कार्यक्रमास देसाई बँक्वेट हॉल येथे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ७ वाजता मराठा भवन येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित सांगितिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तर गुरुवार दिनांक १६ रोजी ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. एकंदरीत सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ना. आशिष शेलार यांचा रत्नागिरी जिल्ह्याचा हा दौरा असून या दौऱ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव व सतीश मोरे यांनी केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!