WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सोनवडे बौध्दवाडी येथे ध्वजस्तंभाची तोडफोड


सोनवडे बौध्दवाडी येथे ध्वजस्तंभाची तोडफोड

देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

आमदार शेखर निकम यांनी घटनास्थळी दिली तातडीने भेट

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे बौध्दवाडी येथे रस्त्याच्या मधोमध असलेल्या ध्वजस्तंभाची अज्ञाताने तोडफोड केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी अज्ञातावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी श्वानपथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेंसिक लॅब यांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, आमदार शेखर निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व पोलीस अधिकाऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. तसेच ग्रामस्थांशीही संवाद साधला. ग्रामस्थांनी दाखवलेल्या संयमाचे विशेष कौतुक केले. तर शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


सोनवडे बौध्दवाडी येथे ध्वजस्तंभाची अज्ञाताने शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तोडफोड केली. मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या हा प्रकार निदर्शनास आला. याची माहिती तत्काळ देवरुख पोलीसांना देण्यात आली. यानुसार देवरूखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे व सहकारी तोडफोड झाल्याचा प्रकार त्यांच्याही निदर्शनास आला. डोळ्यात तेल घालून रात्रभर देवरूख पोलीस यंत्रणा पहारा देत होती. या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी शनिवारी सकाळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ, फॉरेंसीक लॅब यांना पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधिक्षक बाजीराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. दिवसभर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम व देवरूख निरीक्षक उदय झावरे राखीव सुरक्षा दलासह तैनात होते. सायंकाळी पोलीस अधिक्षक नितीन बगाटे हे देखील पोलीस फौजफाटा घेवून घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला व डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती येथील ग्रामस्थांनी दाखवलेला संयम व शांततेचा मार्ग अवलंबल्याने विशेष कौतुक केले. व ध्वजस्तंभाची तोडफोड करणाऱ्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले. तर सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने स्तंभ पुर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!