WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

विहिरीत पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू


विहिरीत पडून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

चिपळूण : शहरातील वाणीआळी परिसरात विहिरीत पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सतीश नारायण जाधव (वय ७०, रा. वाणीआळी, चिपळूण) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे वाणीआळी येथील राजन आवले यांच्या घराच्या पाठीमागील विहिरीजवळ गेले असता, तोल जाऊन ते विहिरीत पडले. पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!