WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आमदार भास्कर जाधवांनी दिल्या मुस्लिम बांधवाना ईदनिमित्त शुभेच्छा!


आमदार भास्कर जाधवांनी दिल्या मुस्लिम बांधवाना ईदनिमित्त शुभेच्छा!

चिपळूणमध्ये एकात्मता आणि सौहार्दाचा हृदयस्पर्शी संदेश

चिपळूण : सण हे केवळ परंपरेचे प्रतीक नसतात, तर ते समाजातील नात्यांना नव्याने उजाळा देण्याची संधी असतात. ईद-उल-फितरच्या निमित्ताने शिवसेना उबाठा गटाचे नेते, आमदार भास्करशेठ जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाची आणि माणुसकीच्या नात्यांची जपणूक करणाऱ्या स्वभावाची प्रचिती दिली.

आमदार भास्करशेठ जाधव यांनी चिपळूणमधील कास्करआळी, पाग परिसरात आपले खंदे समर्थक नगरसेवक श्री. फैसलभाई कास्कर यांच्या निवासस्थानी सस्नेह भेट देत मुस्लिम बांधवांशी ईदच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीत औपचारिकतेपेक्षा आपुलकीचा, राजकारणापेक्षा माणुसकीचा आणि पदापेक्षा नात्यांचा सुगंध अधिक जाणवत होता.

या प्रसंगी कास्करआळी परिसरातील ज्येष्ठ, जाणते तसेच उत्साही तरुण मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध पिढ्यांना जोडणारा हा संवाद केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न राहता सामाजिक सलोखा आणि सौहार्दाचा जिवंत संदेश देणारा ठरला.

नगरसेवक मिथिलेश उर्फ विकी नरळकर, अजय भालेकर, माजी नगरसेवक मोहन मिरगल, बाळा आंबुर्ले, सुमित शिंदे, सचिन चोरगे आदी मान्यवर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

तसेच त्यांनी आपल्या कार्यालयात भेटीसाठी आलेल्या शिरळकर मोहल्ला येथील मुस्लिम बांधव तसेच विश्वासू कार्यकर्ते, खाडीपट्टा उपविभागप्रमुख, शिरळचे माजी सरपंच फैयाज शिरळकर यांनाही ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. या वेळी बशीर बेबल, पोलीस पाटील दिलावर खडपोळकर, बावा शिरळकर, अन्वर चौघुले, मुजफ्फर चिपळूणकर, सरपंच शशिकांत राऊत, विभाग प्रमुख नितीन निकम आदी उपस्थित होते.

भास्कर जाधव यांची राजकीय वाटचाल जितकी ठाम, तितकीच माणुसकीची बाजूही संवेदनशील आहे. सण-उत्सवांच्या निमित्ताने प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून नात्यांची वीण अधिक घट्ट करण्याची त्यांची शैली हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद ठरते. ईदच्या या पावन निमित्ताने त्यांनी दिलेला एकात्मतेचा संदेश चिपळूणच्या सामाजिक वातावरणात आश्वासक ऊब निर्माण करणारा ठरला.

 

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!