WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूण नगर पालिकेच्या इमारत बांधकामाचा 24 तासात जीआर


चिपळूण नगर पालिकेच्या इमारत बांधकामाचा 24 तासात जीआर

लक्ष्मी ऑरगॅनिकवर टाहो फोडणाऱ्यांवर ना. उदय सामंतांची टीका

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या नव्या इमारत बांधकामासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या २४ तासांत काढल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी चिपळूण येथे दिली. आपण स्वतः वयाच्या २८ व्या वर्षी आमदार झालो असल्याचा उल्लेख करत, नव्याने निवडून आलेले नगरसेवकही विकासाभिमुख काम करतील, असा विश्वास त्यांनी बुधवारी चिपळुणात व्यक्त केला.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती काही नवीन नाही, असे सांगत ना.सामंत म्हणाले की, जरी २९ नगरपालिकांमध्ये युती झाली असली तरी प्रत्येक नगरपालिकेवर महायुतीचाच महापौर असेल.
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकरणावर बोलताना ना. उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. काही लोक आपल्या नावाचा कंपनीशी संबंध जोडून व्यासंगी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कंपनीमधून बाहेर पडणारे पीफास जर घातक असतील, तर ती कंपनी सुरूच होऊ दिली जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगूनही विनाकारण टाहो फोडला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “कंपनी नको आहे की पालकमंत्री म्हणून मला त्रास द्यायचा?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सध्या लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये अजून कोणतेही उत्पादन सुरू झालेले नाही, हेही स्पष्ट केले.

उबाठा गटाच्या नगरसेवकांबाबत बोलताना ना.सामंत म्हणाले की, निवडून आलेले उबाठाचे अनेक नगरसेवक विकासकामांसाठी त्यांच्या संपर्कात आहेत. ते जर विकासासाठी आमच्यासोबत आले, तर वर्षानुवर्षे आमच्यासोबत काम करत असल्याप्रमाणेच त्यांना वागणूक दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!