WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘गुरुजी’चे विकृत कारनामे उघड


‘गुरुजी’चे विकृत कारनामे उघड

🔴 शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

🔴 अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन

🔴 दोन महिलांचे बनविले अश्लिल अवस्थेतील बनावट फोटो 

🔴 चिपळूण तालुक्यात खळबळ

चिपळूण : तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच सुसंस्कृत चिपळूण आणखी एका गंभीर प्रकाराने हादरले आहे. ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या एका विकृत शिक्षकाने दोन महिलांचे अश्लिल अवस्थेत बनावट फोटो ‘मॉर्फ’ पध्दतीने तयार केल्याचा आणि अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा अतिशय संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या शिक्षकाला बुधवारी अटक केली आहे. शिक्षकावर पोक्सोसह ऍट्रोसिटी तसेच माहिती व तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा शिक्षक दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होता.


पांडुरंग गोविंद डाकरे (57, कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत फिर्याद संबंधित महिलांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली आहे.

पांडुरंग डाकरे हा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 20 जानेवारी रोजी त्याने दोन महिलांचे वाईट उद्देशाने फोटो बनावट पध्दतीचे मॉर्फ केले. त्यामध्ये पालक महिलेचा देखील समावेश आहे. याबरोबरच त्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी देखील गैरवर्तन केले. हा प्रकार पालकांसह ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्या शिक्षकाला त्यांनी जाब विचारला. यानंतर याप्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलीस स्थानकात पोक्सोसह ऍट्रोसिटी तसेच माहिती तंत्रज्ञान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले करीत आहेत. याप्रकरणी त्या शिक्षकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!