WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा; बारामती विजयामुळे निर्णय


सुनेत्रा पवारांचा खासदारकीचा राजीनामा; बारामती विजयामुळे निर्णय

मुंबई/नवी दिल्ली : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी हा राजीनामा सादर केला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यानंतर पक्षाची धुरा स्वीकारत सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याचबरोबर त्यांनी बीड आणि पुणे या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची धुरा देखील सांभाळली.
दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला. या विजयामुळे त्या आता विधानसभेच्या सदस्य झाल्या असून, घटनात्मक नियमांनुसार एकाच वेळी संसद व विधानसभेचे सदस्यत्व ठेवता येत नसल्याने त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला.

पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी दमदार कामगिरी करत तब्बल 1,18,930 मतांच्या फरकाने विजय मिळवला. यापूर्वी अजित पवार यांनी 1 लाख 65 हजार मताधिक्याचा विक्रम केला होता; मात्र सुनेत्रा पवार यांच्या विजयाने हा आकडा मागे टाकल्याचे सांगितले जात आहे. पोटनिवडणुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या विजयानंतर बारामतीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर मतदारांनी दाखवलेला विश्वास हा त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी आता पूर्णवेळ राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्याच्या सत्ताकारणात येत्या काळात मोठे राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!