WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

शिरगाव येथे उद्या श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा


शिरगाव येथे उद्या श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा

शिरगाव : अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा सालाबादप्रमाणे यंदाही शिरगाव येथील श्री स्वामी समर्थ मठात शुक्रवार, दि. 20 मार्च 2026 रोजी भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 6 वाजता नित्यनेम पूजेला सुरुवात होणार असून सकाळी 8 ते 9 या वेळेत उत्सव मूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9 ते 10 या वेळेत स्वामी नामस्मरण व होमहवन होणार आहे. स्थानिक विश्वकर्मा भजन मंडळ यांचे सकाळी 10 ते 12 या वेळेत भजन सादर होणार आहे. सायंकाळी 6 ते 8 या वेळेत कीर्तनकार सौ. सुखदा मुळये-घाणेकर (पनवेल-मुंबई) यांचे कीर्तन होणार आहे. तद्नंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नामस्मरण, भजन, प्रवचन व अन्नप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे व्यवस्थापन ह.भ.प. माधव चंद्रकांत मेस्त्री व समस्त स्वामी सेवकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पुढील गुरुवार, दि. 26 मार्च 2026 रोजी श्री राम नवमी उत्सवही साजरा होणार आहे.

मठाच्या परिसरात वरच्या बाजूस प्रशस्त शेड उभारण्याचा मानस असून यासाठी भाविकांनी स्वामी सेवेकरिता सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!