WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आमदार प्रमोद जठार 9 मे रोजी जिल्हा दौऱ्यावर


आमदार प्रमोद जठार 9 मे रोजी जिल्हा दौऱ्यावर

चिपळूण : महाराष्ट्र विधान परिषद आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रमोद जठार यांनी हा सन्मान पक्षासाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ते कोकणातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. याकरिता ते शनिवार दिनांक 9 मे रोजी रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

राजापूर पश्चिम व राजापूर पूर्व सकाळी 10 वाजता राजापूर भाजप कार्यालय, लांजा दक्षिण व लांजा उत्तर सकाळी 11.30 शासकीय विश्रामगृह, लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी मध्य, रत्नागिरी दक्षिण, रत्नागिरी उत्तर दुपारी २ वाजता भाजप जिल्हा कार्यालय, रत्नागिरी. संगमेश्वर उत्तर व संगमेश्वर दक्षिण, सायंकाळी 5 वाजता गोळवली प्रकल्प, गोळवली, चिपळूण शहर व चिपळूण ग्रामीण सायंकाळी 7 वाजता श्री. भागवत काका यांचे कार्यालय, मार्कंडी, चिपळूण येथे आमदार प्रमोद जठार हे भेटी देणार आहे. या दौऱ्यात जठार हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त करणार आहेत.

आगामी काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही करणार आहेत. या दौऱ्यात आजी-माजी स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!