WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या पहिल्या सिझनचा भव्य शुभारंभ


मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या पहिल्या सिझनचा भव्य शुभारंभ

चिपळूण : मास्टर्स क्रिकेट अकॅडमी, चिपळूण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या हंगामातील भव्य क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ पवन तलाव मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ क्रीडाप्रेमी दशरथ दाभोळकर, सरफराज शिंग्रे तसेच मुंबई संघाचे प्रशिक्षक दीपक सिंग उपस्थित होते.
या उद्घाटन सोहोळ्याला चिपळूण मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख आकाश पवार आणि सर्व खेळाडूंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचा प्रत्यय देत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे — चिपळूणमध्ये लेदर बॉल क्रिकेटचा हा पहिलाच हंगाम असून, तो संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. एकूण सहा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मुंबईसह रत्नागिरी जिल्ह्यातील नामांकित संघांनी सहभाग नोंदवला आहे. दररोज एकदिवसीय मालिकेच्या स्वरूपात सामने खेळवले जात असून, प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

विशेष म्हणजे, चिपळूण तालुक्यातील पहिले अॅस्ट्रो टर्फ क्रिकेट मैदान मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख आकाश पवार यांच्या प्रयत्नातून साकार झाले आहे. आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट पायाभूत सोयींनी सुसज्ज असलेले हे मैदान खेळाडूंना सराव आणि स्पर्धा दोन्हीसाठी नवी दिशा देणार आहे.

या निमित्ताने क्रिकेटप्रेमींमध्ये नवा जोश आणि स्पर्धात्मकता निर्माण झाली असून, चिपळूणसारख्या तालुक्यात क्रिकेटला नवे आयाम मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!