WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रत्नागिरी जिल्ह्यात यलो अलर्ट! 


रत्नागिरी जिल्ह्यात यलो अलर्ट! 

प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, विजा आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्या माहितीनुसार दि. 27 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पर्जन्यवृष्टी आणि वादळी वा-यांची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी:

विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यास अनावश्यक बाहेर जाणे टाळा.

विजा चमकत असताना टीव्ही, संगणक, मोबाईल, लँडलाईन फोन यांचा वापर करू नका.

झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका.

मोकळ्या जागेत असाल तर गुडघ्यात डोके घेऊन वाकून बसावे, धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे.

वादळी वा-यांत लोखंडी तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

विज पडण्याची पूर्वसूचना मिळवण्यासाठी ‘Damini App’ मोबाईलवर डाउनलोड करून ठेवा.

हवामानाविषयी अचूक माहिती मिळवण्यासाठी https://mausam.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

अफवांवर विश्वास ठेवू नका; अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्या.

☎️ आपत्कालीन परिस्थितीत संपर्क क्रमांक:

📍 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 02352-226248 / 222233

📱 WhatsApp: 7057222233

👮‍♂️ पोलीस हेल्पलाइन: 112 / 02352-222363

⚡ महावितरण नियंत्रण कक्ष: 7875765018

तहसील कार्यालये:

रत्नागिरी – 02352-223127

लांजा – 02351-230024

राजापूर – 02353-222027

संगमेश्वर – 02354-260024

चिपळूण – 02355-252044 / 9673252044

खेड – 02356-263031

दापोली – 02358-282036

गुहागर – 02359-240237

मंडणगड – 02350-225236

  प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवित आणि मालमत्तेची काळजी घ्यावी व सुरक्षित स्थळी राहावे.


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!