WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सावर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा शुभारंभ


सावर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा शुभारंभ

चिपळूण, ता. ९ ः तालुक्यातील ग्रामस्थांना दर्जेदार शासकीय सेवा मिळण्यासाठी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबवण्यात येत आहे. तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायतीत आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यानिमीत्ताने मोठ्या प्रमाणात विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
या शिबिरात ग्रामस्थांना विविध महसुली दाखले व शासकीय योजनांचा लाभ थेट देण्यात आला. त्यामध्ये सातबारा उतारे- ५१७, ८ – अ उतारे- २८७, मंजूर फेरफार – ५९, तर जाती, नॉन-क्रीमी लेयर, उत्पन्न, वय, अधिवास, राष्ट्रीयत्व आदी दाखले- ३२४ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. आधार अपडेट २४, तुकडेबंदी नियमितीकरण फेरफार ३०, अकृषिक परवानगीतील कमी-जास्त पत्रक प्रकरणे १२ आणि सातबारा दुरुस्ती संदर्भातील अर्ज ३२ स्वीकारण्यात आले. याशिवाय संजय गांधी योजनेअंतर्गत २३ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली. पुरवठा विभागाकडून नाव कमी करणे ५२, नाव वाढविणे – ६६, आणि २४ नवीन अंत्योदय शिधापत्रिका देण्यात आल्या. निवडणूक विभागाकडून नमुना ६ चे २, नमुना ७ चे १७ आणि नमुना ८ चे १८ अर्ज स्वीकारण्यात आले. कृषी विभागामार्फत महाविस्तार ॲप नोंदणी २२, ॲग्रीस्ट्रॅक नोंदणी २९, पीएम किसान १६ व महा-डीबीटीचा १ अर्ज करण्यात आला. तसेच आयुष्यमान भारत कार्डसाठी ३३ लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यात आली. पंचायत समितीकडून जन्म दाखले २२, विवाह प्रमाणपत्रे १२, असेसमेंट उतारे २० तसेच ९ जणांना घरकुल लाभ देण्यात आला. आरोग्य विभागाकडून उपस्थित लाभार्थ्यांची शुगर, बीपी आदी आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.
भूमी अभिलेख विभागाकडून ई-मोजणी, ई-नकाशा, प्रॉपट कार्ड व वारस तपासणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तर सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या विविध योजनांची माहिती दिली. या शिबिरास सुमारे २६० नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे, नितीन ठसाळे, संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सरपंच, प्रशासक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!