WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती उत्साहात


त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती उत्साहात 

पंचशील क्रीडा मंडळ, तिसगाव विभाग चिपळूणचा उपक्रम

चिपळूण : पंचशील क्रीडा मंडळ, तिसगाव विभाग चिपळूण यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई यांची १२८ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष विशाल तुळशीराम मोहिते यांच्या निवासस्थानी आयोजित या कार्यक्रमाला सामाजिक, धार्मिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक विकास ग्रुपचे मुख्य प्रवर्तक व समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी धम्मवंदना व त्रिशरण गाथा म्हणून माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाला अभिवादन केले. त्यांच्या कार्याचा आणि संघर्षमय जीवनप्रवासाचा उल्लेख करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमास राजेंद्र मोहिते, मनोहर मोहिते, अंकुश गमरे, विरेंद्र जाधव, सीमा मोहिते, प्रणाली मोहिते, कमला मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमातून समाजात ऐक्य, समता आणि बंधुता यांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचशील क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात येत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!