WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कुंभार समाजातर्फे भव्य रक्तदान शिबीर


कुंभार समाजातर्फे भव्य रक्तदान शिबीर

खेर्डीतील संस्थेच्या सभागृहात आयोजन, संत गोरा कुंभार युवा आघाडीचा पुढाकार

 

चिपळूण, ता. १६ ः येथील संत गोरा कुंभार विकास मंडळ व संत गोरा कुंभार युवा आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास समाजबांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. समाजातील युवकांसह ज्येष्ठांनी शिबीरात मोट्या संख्येने सहभागी होत सामाजिक बांधीलकी जोपासत रक्तदान केले.
जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या सहकार्यातून कुंभार समाजाच्या खेर्डी येथील संस्कार व्हॅली इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम च्या सभागृहात रविवारी सकाळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. संत गोरा कुंभार विकास मंडळ तसेच युवा आघाडीच्या वतीने समाजाच्या प्रगतीसाठी सातत्यने विविध उपकमांचे आयोजन केले जाते. समाजासाठी जिल्हाभरात शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक तसेच क्रीडा स्पर्धांे आयोजन केले जाते. समाजाच्या युवाआघाडीच्या पुढाकाराने सामाजिक बांधीलकीतून रक्तदान शिबीर आयोजित केल्याचे मत कुंभार समाजाचे कोकण अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी संत गोरा कुंभार विकास मंडळाच्या विविध उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. समाजाची भक्कम एकजूठ अशीच ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका कार्याध्यक्ष रवी साळवी, उपाध्यक्ष दिपक शिरकर, अमोल पिरदनकर, सचिव प्रकाश कराडकर, पतसंस्था अध्यक्ष तुकाराम साळवी, उपाध्यक्ष तुकाराम टेरवकर, बबन पडवेकर, संचालिका सुमन साळवी, महिला तालुकाध्यक्षा सौ. स्वप्नाली कराडकर, सौ. राजेश्री टेरवकर, रविंद्र शिरकर, संचालक सुनिल पडवेकर, पाडुरंग कुंभार, दिपक साळवी, मनोहर बुरबाडकर, अरविंद गुडेकर, अण्णा साळवी, सोनू कुंभार, प्रदिप शिरकर, युवा आघाडी अध्यक्ष दिनेश वहाळकर, उपाध्यक्ष मंगेश बुरबाडकर, दिनेश गुडेकर, मुबई संपर्क प्रमुख योगेश साळवी, राजेंद्र निवळकर, अमित बुरबाडकर, सुरज पडवेकर, ज्ञानदेव कुंभार, सुबोध कुंभार, अजित निवळकर, स्वप्निल चिपळूणकर, मंगेश गुडेकर, वैभव साळवी, संकेत कुंभार, सुरज लांजेकर, शुभम शिरकर, संतोष साळवी, यांच्यासह रक्तयोद्धा उमेश खैर उपस्थित होते.

 

 

 


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!