WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मी रडणारा नाही लढणारा – जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण


मी रडणारा नाही लढणारा – जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण

चिपळूण, ता. ८ ः मी पक्षविरोधी काम केले तरी काय ?…कोणाला भेटायला जाणे हे पक्षविरोधी काम होऊ शकते का ?…मी पस्तीस चाळीस वर्षे आमदार भास्करराव जाधव यांच्या सोबत काम करतोय. कोणतीही खातरजमा न करता जर माझ्यासारख्याची ऐका सेकंदात हकालपट्टी होत असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची काय अवस्था, मी रडणारा नाही, लढणारा आहे, मागे हटणार नाही, असा सवाल माजी तालुकाप्रमुख जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
रामपूर विभागाचे आक्रमक नेतृत्व आणि आमदार जाधव यांचे जवळचे सहकारी जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांची नुकतीच उबठा शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. या हकालपट्टीने चिपळूण गुहागर शिवसैनिकामध्ये एकच खळबळ उडाली. नेमकी कारवाई का हाच प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत पप्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. अनुजा चव्हाण याही उपस्थित होत्या.
प्प्या चव्हाण म्हणालेस माझ्यावर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप झाला, मी असे कोणते काम केले आहे, ते तरी पुढे यायला हवं. ज्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत विरोधी काम केले त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाली नाही. माझ्यावरच कारवाई केली हेच मला ही काही कळत नाही. मी माझ्या कामासाठी कोणाला भेटायला गेलो हा माझा गुन्हा आहे का, हेच पक्षविरोधी माझे काम का ? आणि असे असेल तर मग नेते विरोधीपक्षाच्या लोकांच्या नेत्याच्या घरी जातात हे पक्षविरोधी नाही का, असा सवाल जितेंद्र चव्हाण यांनी करून कार्यकर्त्यांना नेत्याकडे जायला बंदी आणि नेत्याना मात्र सर्वांची दारे खुली का कोणता प्रकार असा सवाल ही त्यानी केला. मी आमदार जाधव यांच्या सोबत अनेक वर्षे काम करीत आहे. माझ्यावर कारवाई करताना किमान शहानिशा करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. माझ्यासारख्याची जर ही अवस्था झाली तर मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय, शिवाय भविष्यात राजकारणात नवी पिढी उतरेल का आणि उतरली तर त्याचे काय होईल, असा सवाल ही त्यानी केला. माझ्यावर कारवाई झाली होउदे मला माझ्या प्रामाणिकपणाचे फळ मिळाले आहे. मात्र मी खचून जाणारा नाही मी रडणारा नव्हे तर लढणारा आहे, हे साऱ्यांना माहीत आहे. त्यामुळे येईल त्या स्थितीला सामोरी जाण्याची माझी तयारी आहे.
मी अजून पुढे काय करायचे याचा विचार केलेला नाही. कारण तसा प्रश्नच येत नव्हता. मात्र आता विचार करावा लागणार आहे, येत्या काही दिवसात या संदर्भात आपण निर्णय घेऊ. माझ्यासोबत असणारे माझे सहकारी, मला साथ देणारे मित्र मंडळी यांच्यासोबत विचारविनिमय करून निर्णय घेऊ असे चव्हाण यांनी स्पष्ठ केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!