सह्याद्री शिक्षण संस्थेचे नूतन कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांचा सत्कार
चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षपदी आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव व युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले अनिरुद्ध निकम यांची निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी खेर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, एमआयडीसीचे अधिकारी श्री. कोकरे, जिल्हा परिषद सदस्य संजय कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी अनिरुद्ध निकम यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, अनिरुद्ध निकम यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री शिक्षण संस्थेची प्रगती नव्या उंचीवर जाईल. शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून संस्थेची वाटचाल अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनिरुद्ध निकम यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.











