करसल्लागार निशा आंबेकर यांना राज्यस्तरीय मास्टर्स स्पर्धेत ६ सुवर्णपदके
चिपळूण ः महाराष्ट्र मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशन तर्फे पुणे येथे राज्यस्तरीय अथलेटिक्स, स्विमिंग, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, हॉलि्बॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबलटेनिस आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये चिपळूणच्या करसल्लागार सौ. निशा आंबेकर यांनी ४५ वरील वयोगटात सुवर्णपदकांची लयलूट केली. त्यांनी गोळाफेक, थाळीफेक, हॅमर थ्रो, १०० मी फ्री स्टाईल, २०० मी फ्री स्टाईल आणि पॉवरलिफ्टिंग या सहा प्रकारात सुवर्णपदक पटकावले. तर ५० मी. फ्री स्टाईल मध्ये सिल्व्हर मेडल मिळवले. या स्पर्धेत सर्वाधिक मेडल मिळवणारी त्या एकमेव खेळाडू ठरल्या. त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
व्यवसायाने कर सल्लागार असलेल्या सौ. निशा गजानन आंबेकर यांना बीकॉम, एमबीए, जीडीसी अॅण्ड ए चे शिक्षण घेताना शाळा कॉलेज जीवनापासून खेळाची आवड होती. त्यावेळी आंबेकर या जिल्हा, राज्य,विद्यापीठ, आंतरविद्यापीठ स्तरावर अॅथलेटिक्स मध्ये मेडल्स मिळवत होत्य. १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर धावणे, थाळीफेक, गोळफेक, हॅमर थ्रो, आणि पॅावर लिफ्टिंग. हे त्यांचे इव्हेंट्स होते. लिफ्टिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड होऊन देखील निधी अभावी जाता आले नाही. महाविद्यालयीन जिवनात त्यांनी एनसीसीमध्ये पाणबूडीचे प्रशिक्षण हा त्यांचा सर्वात आनंदाचा क्षण. स्कूबा डायव्हिंग करणारी भारतातील तिसरी, महाराष्ट्रात दुसरी तर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली ती महिला ठरली आहे. विहाहानंतर क्षेर मात्र क्षेत्र बदललं. कर सल्लागार आणि प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. गेली १८ वर्ष त्या यामध्ये कार्यरत आहेत. निशा आंबेकर या अत्यंत धाडसी आणि कोणतेही काम झोकून देऊन यशस्वीपणे पूर्ण करतात. आता २२ वर्षानंतर पुन्हा फिटनेस साठी सायकलिंग आणि खेळाचा सराव सुरू केला. गेल्या वर्षी शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय खेलो मास्टर्स अंतर्गत विविध क्रीडा प्रकारात ८ सुवर्ण पदकांची लयलूट केली होती. राष्ट्रीय स्तरावर गोवा येथे ३ गोल्ड, २ सिल्वर, १ ब्राँझ पदक मिळवले. नोव्हेबर २०२३ मध्ये पोहणे आणि मैदानी खेळात ३ सुवर्ण, २ रौप्य तर १ ब्राँझ पदक मिळवले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये २००, ३००, ४०० आणि ६०० किमी सायकलिंग करून सायकलिंग क्षेत्रातील मनाचा समजला जाणारा Super Randonnuer हा ‘किताब मिळवला. ५ ऑक्टोबर २०५ रोजी कोल्हापूर लोहपुरुष स्पर्धेत रिले प्रकारात 2 किमी पोहणे, १ तास ५ मिनिटात पूर्ण करत लोहपुरुष रिले च्या मानकरी ठरल्या. नोव्हेंबर २०२५ मध्ये इंटरनॅशनल लेवल गोवा आयर्न मॅन स्पर्धेत रिले प्रकारात समुद्रात २ किमी स्विमिंग ४८ मिनिटात पोहून आयर्न मॅन (रिले) पदक मिळवले.
या कामगिरीच्या जोरावर त्यांचा विविध संस्थांनी पुरस्कार देत गौरव केला आहे. त्यांनी विविध पाककला तसेच केक स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवली आहेत. त्या क्रीडाभारती, संस्कृतभारती, चिपळूण सायकलिंग क्लब, परिमल मंडळ आदी संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. व्यसनाधीन लोक व त्यांच्या कुटुंबियांसाठी त्या विशेष काम करतात.










