उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २९ ला चिपळुणात
चिपळूण – शिवसेनेने चिपळूण पालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे. शिवसेनेचा नगराध्यक्ष येथे विराजमान झालेला नाही. पालकमंत्री उदय सामंत देखील चिपळूणातील बदलत्या राजकारणावर बारिक लक्ष ठेवून आहेत. येथे युतीने मोठा फोकस ठेवला आहे. युती धर्म पाळतानाच पक्षाचे उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपुर्वी जाहीरपणे न बोलता संबंधीतांना जे सांगायचे ते सांगितले आहे. तर चिपळूणात शिवसेनेची लाट पसरण्यासाठी २९ रोजी उमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्व तालुक्याच्या ठिकाणी ते भेटी देणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Views: 325












