WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

डॉ. श्रीयश बुदर यांचा कुणबी शिक्षण मंडळातर्फे सन्मान


डॉ. श्रीयश बुदर यांचा कुणबी शिक्षण शिक्षण मंडळातर्फे सन्मान

 

चिपळूण – येथील कुणबी शिक्षण मंडळाच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल डॉक्टर श्रीयश दिलीप बुदर यांचा गौरव करण्यात आला. कोकरे सारख्या ग्रामीण भागातून येत मेहनत आणि जिद्दीने मिळवलेल्या यशाबद्दल श्रीयश चा उद्योजक वसंतशेठ उदेग यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

श्रीयश बुदर याचे पहिले ते दहावी पर्यंत शिक्षण परशुराम येथील एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. दहावी मध्ये त्याने 96 टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण मुंबई येथील महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर नीट परीक्षेत त्याला 564 गुण मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग येथील शासकीय एमबीबीएस कॉलेजला प्रवेश मिळाला. आपल्या कुशल बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने प्रथम श्रेणी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आई वडिलांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. श्रीयश याचे वडील दिलीप बुदर हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असतात. कुणबी समाजाच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान देखील दिले आहे. तर आई दिक्षा बुदर ( संगिता खांबे) या ग्रामपंचायत अधिकारी असून त्यांचेही श्रीयश ला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल कुणबी शिक्षण मंडळाच्या वतीने श्रीयश याचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कुणबी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वसंत उदेग, विश्वस्त विलास खेराडे, हरिश्चंद्र गोताड, उपाध्यक्ष अशोक निर्मळ,  सहसेक्रेटरी दिलीप बुदर, सदस्य श्रीपाद कोदारे, रमेश राणे, चंद्रकांत मांडवकर, संदीप तांदळे, संजय जाबरे, सुहास चव्हाण, हरिश्चंद्र फुटक, विकास बैकर, प्रदीप उदेग, महेंद्र शिरकर,  रवींद्र कोकमकर आदी उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!