WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूण तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९१.०१ टक्के


चिपळूण तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९१.०१ टक्के

अवघी १० महाविद्यालये १०० टक्के पास

चिपळूण : चिपळूण तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ९१.०१ टक्के लागला आहे. चिपळूण तालुक्यातून ३ हजार ६५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ३ हजार ३९ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामध्ये २ हजार ७६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यमध्ये १५१, प्रथम श्रेणीत ४९१, द्वितीय श्रेणीत १४७९ तर पास श्रेणीत ६४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच ६२ पैकी ५७ रिपीटर्स उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील एकूण ३२ महाविद्यालयांपैकी अवघ्या १० महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल पुढीलप्रमाणे- डीबीजे महाविद्यालयातून ७७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ७७२ विद्यार्थी परीक्षेला बसले, पैकी ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८८.७३ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ७२, प्रथम श्रेणीत १३९, द्वितीय श्रेणीत ३२२ तर पास श्रेणीत १५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज सावर्डेमधून ४१४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ४११ पैकी ३९९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.०९ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ८, प्रथम श्रेणीत ५२, द्वितीय श्रेणीत २६२ तर पास श्रेणीत ७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिरगाव ज्युनियर कॉलेजमधून ५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ५३ विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९०.५६ टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम श्रेणीत २, द्वितीय श्रेणीत १५ तर पास श्रेणीत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मिलिंद हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज रामपूर या महाविद्यालयातून ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ५० पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९४ टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम श्रेणीत ६, द्वितीय श्रेणीत २७ तर पास श्रेणीत १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कमलाबाई वामन पेठे ज्युनियर कॉलेज मार्गताम्हाणेमधून १०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये १०१ विद्यार्थ्यांपैकी ९८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९७.०२ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ३, प्रथम श्रेणीत १८, द्वितीय श्रेणीत ४९ तर पास श्रेणीत २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज अलोरे विद्यालयातून ९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ९३ पैकी ६८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७३.११ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत १, प्रथम श्रेणीत ५, द्वितीय श्रेणीत २७ तर पास श्रेणीत ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज वहाळ येथून ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ५३ पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७३.५८ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत १, प्रथम श्रेणीत ५, द्वितीय श्रेणीत २१ तर पास श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज खेर्डी चिंचघरीमधून ३१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ३१९ पैकी २९७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९३.१० टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ७, प्रथम श्रेणीत ३०, द्वितीय श्रेणीत १८९ तर पास श्रेणीत ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. फातिमा दलवाई ज्युनियर कॉलेज कालुस्तेमधून ७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ७२ पैकी ६९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९५.८३ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ५, प्रथम श्रेणीत १३, द्वितीय श्रेणीत ३२ तर पास श्रेणीत १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज आर्टस् चिपळूणमधून ४७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ४५ पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७३.३३ टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम श्रेणीत ४, द्वितीय श्रेणीत १४ तर पास श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

माता रमाई आंबेडकर ज्युनियर कॉलेज कळंबस्तेमधून ३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये २ विद्यार्थी प्रविष्ठ झाले मात्र, एकही विद्यार्थी उत्तीर्ण झालेला नाही. डॉ. तानाजीराव चोरगे ज्युनियर विज्ञान कॉलेज मांडकी-पालवणमधून १६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये १६२ पैकी १४२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८७.६५ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ५, प्रथम श्रेणीत १२, द्वितीय श्रेणीत ७४ तर पास श्रेणीत ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. श्री रामवरदायिनी विद्यालय निरबाडेमधून ३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ३५ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७४.२८ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत १, प्रथम श्रेणीत २, द्वितीय श्रेणीत ८ तर पास श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मोहन विद्यालय आकलेमधून ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ३० पैकी २३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ७६.६६ टक्के निकाल लागल. यामध्ये प्रथम श्रेणीत ६, द्वितीय श्रेणीत ८ तर पास श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

वसंतराव देसाई माध्यमिक विद्यालय असुर्डे आंबतखोलमधून ७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ७१ पैकी ६१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८५.९१ टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम श्रेणीत १४, द्वितीय श्रेणीत ३५ तर पास श्रेणीत १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बाळासाहेब माटे कनिष्ठ महाविद्यालय कामथे येथून ४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ४३ पैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८३.७२ टक्के निकाल लागला. यामध्ये प्रथम श्रेणीत १, द्वितीय श्रेणीत २६ तर पास श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वसंत जयराम भागवत विद्यामंदिर अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज बोरगावमधून २१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये २१ पैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९०.४७ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ५, प्रथम श्रेणीत ७ तर द्वितीय श्रेणीत ६ तर पास श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.

आनंदराव पवार ज्युनियर कॉलेज चिपळूणमधून ७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ७२ पैकी ६३ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८७.५० टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ४, प्रथम श्रेणीत १३, द्वितीय श्रेणीत ३२ तर पास श्रेणीत १४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सौ. शैलजा शिंदे आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमधून २४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये २२ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ६३.६३ टक्के निकाल लागला. यामध्ये द्वितीय श्रेणीत ६ तर पास श्रेणीत ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. खासगी आयटीआय सावर्डेमधून २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये २० पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८५ टक्के निकाल लागला. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत १, प्रथम श्रेणीत ७, द्वितीय श्रेणीत ५ तर पास श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

शासकीय आयटीआय चिपळूणमधून ३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ३१ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८३.८७ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ३, प्रथम श्रेणीत १५, द्वितीय श्रेणीत ७ तर पास श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.

सावर्डे ज्युनियर कॉलेजमधून ५३ पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये पुर्नपरिक्षार्थी ५२ पैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ९०.३८ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये विशेष योग्यता श्रेणीत ३, प्रथम श्रेणीत ७, द्वितीय श्रेणीत ३३ तर पास श्रेणीत ४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शिरगाव हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये १० पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये १० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन १०० टक्के निकाल लागला आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!