WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

एकाने घेतली यादी, तर दुसऱ्याने केली चाचपणी – सत्तेसाठी चिपळूणात हालचालींना वेग


एकाने घेतली यादी, तर दुसऱ्याने केली चाचपणी – सत्तेसाठी चिपळूणात हालचालींना वेग

चिपळूण : शहराच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडे पक्षातील ७ इच्छूकांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी मध्ये भाजपमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. उद्धव सेनेने उमेदवारी मागणाऱ्यांना पक्ष आणि समाजासाठी काय योगदान दिले ते अगोदर सांगा अशी विचारणा इच्छूकांना केली आहे. त्यामुळे उद्धव सेनेतील इच्छूकही बुचकळ्यात पडले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल बाजले आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झाल्यामुळे इच्छूक तयारीला लागले आहेत. दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार असले तरी त्याअगोदर इच्छूकांची चाचपणी सुरू झाली आहे. आघाडी, युती होण्यापूर्वीच उमेदवारीवरून संघर्षाची ठिणगी पडायला सुरवात झाली आहे. आघाडी, महायुती होवो न होवो पण सर्वच पक्षाकडून स्वबळाची तयारी सुरू आहे. चिपळूण शहराचे नगराध्यक्षपद खुल्या वर्गासाठी आरक्षित झाले आहे. या वर्गात महिला उमेदवारही उभी राहू शकते. त्यामुळे भाजपमधील अनेक माजी नगरसेवकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. १९ तारखेपर्यंत भाजपने इच्छूकांकडे अर्ज मागितले होते. नगरसेवक पदाच्या २८ जागांसाठी भाजपकडे तब्बल ६५ अर्ज आले आहेत. तसेच नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे काहींनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल म्हणून ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत अर्ज केलेला नाही. दुसरीकडे उद्धव सेनेही निवडणूकीच्या तयारीत उतरली आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांनी नुकतेच गुप्त बैठक झाली. त्या बैठकीत काहींनी नगराध्यक्षपदासाठी तर काहींनी नगरसेवकपदासाठी इच्छूक असल्याची भावना व्यक्त केली. उद्धव सेनेतही इच्छूकांची संख्या मोठी आहे. नगराध्यक्षपदासाठी एक पैक्षा जास्त इच्छूक आहेत. प्रभाग आरक्षणात ज्यांची नगरसेवक पदाची संधी हुकली आहे. ते वरिष्ठ कार्यकर्ते नगराध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. तर काहींना घरातील सदस्यांना उमेदवारी हवी आहे. अशा पक्षा पदाधिकाऱ्यांनी आपण पक्षासाठी समाजासाठी काय योगदान दिले ते सांगा त्याचा विचार करूनच उमेदवारी दिली जाईल. असे सांगून पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेले आणि इच्छूकांच्या गर्दीत सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांना चाप लावला आहे. त्यामुळे आगामी काळात नगर परिषदेच्या निवडणूकीत रंगत येणार आहे.
————


619
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!