गुरू रविदास महाराजांच्या जन्मभूमीतील पवित्र मातीच्या कलशाचे चिपळुणात आगमन
🟢भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत
🟢भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

खेर्डी (चिपळूण) : संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या 650 व्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे समरसता संकल्प अभियान सुरू करण्यात आले आहे. संत रविदास महाराज यांच्या जन्मभूमीची पवित्र माती असलेल्या कलशाचे शनिवारी (ता. 8) सायंकाळी छत्रपती संभाजीनगर येथून चिपळुणात आगमन झाले. खेर्डी येथे रेल्वे पुलाजवळ कलशाचे आगमन झाल्यानंतर मोठ्या भावपूर्ण वातावरणात हे कलश भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या निवासस्थानी स्थापन केलेल्या साई मंदिरात आणण्यात आले. यावेळी यावेळी कलशाचे वाजत-गाजत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी छत्रपती संभाजीनगर येथून कलश आणणारे भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर, नगरसेवक संदीप भिसे आणि युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी कलशाला नमन करून त्याचे पूजन केले.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, संगमेश्वर दक्षिण मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष तसेच नगरपालिकेतील भाजप गटनेते शशिकांत मोदी, भाजपचे जिल्हा चिटणीस समीर टाकळे, जिल्हा चिटणीस ॲड्. नयना पवार, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष चितळे, जिल्हा परिषद सदस्य रावी मोरे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक, पंचायत समिती सदस्य सुप्रिया देवरुखकर, नगरसेवक शुभम पिसे, जिल्हा सदस्य चंद्रकांत जाधव, जिल्हा सदस्य विभावरी जाधव, जिल्हा सदस्य शशिकांत साळवी, दीपक महाडिक, चिपळूण ग्रामीण मंडल प्रभारी रामदास राणे, चिपळूण शहर मंडल प्रभारी विजय चितळे, माजी नगरसेवक रतन पवार, राकेश दाते, चिपळूण ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस निखिल किल्लेकर, साई मंडल सेल जिल्हाध्यक्ष महेश महाडिक, पिंपळीचे माजी सरपंच दादा देवरुखकर, दत्तात्रय शेटे, नरेंद्र बेलवलकर, मधुकर निमकर, विलास चव्हाण, माधुरी शिंदे, विलास चव्हाण, शक्तीकुमार चव्हाण, अभिषेक जागुष्ट्ये, अमोल तटकरे, सुरज पडवेकर, अन्वर जबले, शमुन घारे, गुलजार कुरवले, प्राजक्ता टाकळे, डॉ. स्वामिनी यादव, तृप्ती यादव, प्रथमेश शिंदे, महेश दीक्षित, चिपळूण ग्रामीण सरचिटणीस दीपक शिंदे, दिनेश लटके, जगदीश गोरीवले, यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कलश जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी साई मंदिरातील आरतीचा लाभ घेतला.










