WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष मुक्त


महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ निर्दोष मुक्त

एसीबीपाठोपाठ ईडीकडूनही क्लिनचिट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबतची मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एसीबीपाठोपाठ आता ईडीकडून निर्दोष मुक्तता देण्यात आली आहे. यामुळे भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याआधीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) या प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील त्यांना क्लिनचिट दिल्याने या प्रकरणावर जवळपास पडदा पडल्याचे मानले जात आहे.

 

निर्दोष मुक्ततेचा अर्ज मंजूर
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ आणि इतर आरोपींकडून ईडीकडे निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. ईडीने हा अर्ज मंजूर करत भुजबळ यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा?
दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर करण्यात आला होता. या कथित घोटाळ्याची रक्कम सुमारे ८५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्यासह एकूण १४ जण आरोपी होते. आरोपांनंतर भुजबळ यांना सुमारे दोन वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र आता ACB आणि ED दोन्ही तपास यंत्रणांकडून निर्दोष मुक्तता मिळाल्याने छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला असून, राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!