WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

डीबीजेत मंगळवारी करियर मार्गदर्शनपर कार्यक्रम


डीबीजेत मंगळवारी करियर मार्गदर्शनपर कार्यक्रम

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी अकरा वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हाॅलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दहावीनंतर विद्यार्थ्यांचे करिअर निवड करणे हा  पालकांसमोरील फार मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अकरावी मध्ये प्रवेश घेताना विद्यार्थी व पालक हे गोंधळलेल्या अवस्थेत असतात. याच गोष्टीचा विचार करून येथील डीबीजे महाविद्यालयाने करियर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतून कोणकोणत्या क्षेत्रात करिअर करू शकतो याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.तसेच आपल्या मुलांची आवड व कल ओळखून योग्य विषय कसे निवडावेत. शासनाने इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया मागील वर्षापासून ऑनलाइन केली आहे. प्रवेशासाठी फॉर्म भरण्यापासून ते प्रवेश मिळेपर्यंतच्या सर्व टप्प्यांबद्दल माहिती दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेताना सोपे होणार आहे.

तरी सर्व विद्यार्थी व पालक यांनी या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्या प्रा.सौ.स्नेहल कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ.सुजाता खोत, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव यांनी केले आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!