भाजपच्या विजयाचा पेढे वाटून चिपळुणात जल्लोष
चिपळूण : भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी येथील निवडणुकांमध्ये मिळवलेल्या दणदणीत यशाच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. शहर मंडळाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिंचनाका येथे हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या व मार्गदर्शक सौ. अर्चना बक्षी यांनी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि शहराध्यक्ष शशिकांत मोदी यांना पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा केला. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “नरेंद्र मोदी आगे बढो” आणि “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान वाहनचालक, पादचारी तसेच नागरिकांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या जल्लोषात स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष (उत्तर) सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, कोषाध्यक्ष आशिष खातू, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, सरचिटणीस सारिका भावे, विनायक वरवडेकर, महिला मोर्चा अध्यक्ष रसिका देवळेकर, सभापती शुभम पिसे, नगरसेविका अंजली कदम, शीतल रानडे, नगरसेवक संदीप भिसे, माजी नगरसेवक विजय चितळे, उपाध्यक्ष नरेंद्र बेलवलकर, मधुकर निमकर, महेश दीक्षित, प्रणय वाडकर, विमल लढ्ढा, संगीता पालकर, प्राजक्ता टाकळे, प्रभंजन पिंपुटकर, अमोल तटकरे, अक्षय ओतारी, महेश कांबळी, जगदीश गोरीवले, महेश विंचू आदी उपस्थित होते.
एकूणच, भाजपच्या विजयाच्या निमित्ताने चिपळूणमध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.











