WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आगवे येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्याला अटक


आगवे येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्याला अटक

बंदुका व जिवंत काडतुसे जप्त

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे, वाहतूक व वापर यावर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सावर्डे पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत एकास अटक केली आहे. या कारवाईत बंदुका व जिवंत काडतुसे असा सुमारे 70 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथक 18 मार्च 2026 रोजी सावर्डे परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी मौजे आगवे (ता. चिपळूण) येथे महेश जाधव नावाचा इसम घराच्या मागील बाजूस अवैध दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. पाहणीदरम्यान घराच्या मागील बाजूस असलेल्या गुरांच्या गोठ्याजवळील लाकडी खोपटीत एक इसम बंदुकीची साफसफाई करताना आढळून आला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव महेश महेंद्र जाधव (वय 35, रा. आगवे बौद्धवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे सांगितले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक आढळली. शस्त्र बाळगण्याचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर अधिक तपासणी केली असता पथकाला खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला:
एक सिंगल बॅरल काडतुसाची बंदूक
एक जुनी नादुरुस्त ठासणीची बंदूक
9 जिवंत काडतुसे

सर्व साहित्य पंचासमक्ष जप्त करण्यात आले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 24/2026 अंतर्गत शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3(1) व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सावर्डे पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ तसेच चालक पोलीस शिपाई अतुल कांबळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!