WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मध्यरात्री पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात : एकाचा जागीच मृत्यू


मध्यरात्री पर्यटकांच्या कारचा भीषण अपघात : एकाचा जागीच मृत्यू

परशुराम घाटातील घटना, तिघे जखमी

खेड : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शनिवारी (दि. ४ एप्रिल) मध्यरात्री सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक संजय भंडारी (वय २८, रा. कांंची, ता. नाशिक) हा आपल्या मित्रांसह महिंद्रा XUV300 (MH 15 JH 0516) या कारने गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी जात होता. परशुराम घाट परिसरात आल्यानंतर चालकाने भरधाव वेगात वाहन चालवताना नियंत्रण गमावले. त्यामुळे कार रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाली.

या भीषण अपघातात रोहित संतोष भालेकर (वय २८, रा. इंदिरानगर, नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कृष्णा संपत आढाड (वय ३१, रा. चापडगाव, ता. निफाड), संदीप चंद्रभान डिंगरे (वय ३६, रा. पळसे, नाशिक) तसेच चालक प्रतीक भंडारी हे जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र, चिपळूण येथील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक इश्वर्द बेग यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खोंडल व नटे यांनी तत्परतेने मदतकार्य पार पाडले.

या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!