WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

डी.बी.जे. महाविद्यालयाच्या तन्वी रेडीजची ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’साठी निवड


डी.बी.जे. महाविद्यालयाच्या तन्वी रेडीजची ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’साठी निवड

 

चिपळूण : येथील नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. (स्वायत्त) महाविद्यालयात बी.एस्सी. अंतिम वर्षात शिक्षण घेणारी योगपटू कु. तन्वी रेडीज हिची ‘वर्ल्ड चॅम्पियनशीप’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हरियाणा येथे झालेल्या निवड चाचणीत तिची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून जून २०२६ मध्ये गुजरात येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तन्वीने यापूर्वीही योग या क्रीडा प्रकारात भरीव यश संपादन केले आहे. सन २०२५ मधील एशियन गेम्समध्ये तिने दोन सुवर्णपदके जिंकली होती. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत तिने १० सुवर्ण, ३ रौप्य आणि १ कांस्य पदकांची कमाई केली आहे.तिच्या या यशामागे प्रशिक्षक रणवीर सावंत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. तन्वीच्या निवडीबद्दल नवकोंकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, उपप्राचार्य डॉ. ऋचा खवणेकर, डॉ. चेतन आठवले, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!