WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आजच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी गांधी-आंबेडकर समन्वयाची गरज


आजच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी गांधी-आंबेडकर समन्वयाची गरज

ज्येष्ठ विचारवंत सुरेश सावंत यांचे प्रतिपादन

चिपळूण : आपल्या देशातील आव्हानांचा सामना करण्यासाठी गांधी-आंबेडकर-नेहरु यांच्या समन्वयाची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक व विचारवंत सुरेश सावंत यांनी केले.

गांधी पुण्यतिथी दिनी पूज्य गांधी प्रतिष्ठानतर्फे येथील दिवंगत पुरोगामी कार्यकर्ते साथी चंद्रकांत खातू यांच्या स्मृति निमित्त आयोजित गांधी-आंबेडकरः संघर्ष व परस्पर पुरकता या विषयावर ते बोलत होते. श्री. सावंत ते पुढे म्हणाले “इतिहातील म.गांधी व डॉ. आंबेडकर यांच्या भूमिका वेगवेगळ्या होत्या. सामाजिक व राजकिय प्रश्नां संबंधी त्या-त्या भूमिकेतून, दृष्टिकोनातून ते बघत होते त्यामुळे त्यांच्यात काही वेळा संघर्ष झाला माञ या दोघांच्या भूमिका परस्पर पूरकही होत्या… गांधींजींचा स्वतंत्र मतदारसंघाला विरोध होता पण त्यांनी दलितांना राखीव जागांना विरोध केला नाही हे समजून घेतले पाहिजे. दोघांतील वैचारिक विरोध म्हणजे हे काही “खानदानी भांडण” नव्हे म्हणून संविधानवादी सर्वच कार्यकर्त्यांनी आपापसातील किरकोळ मतभेद बाजूला ठेऊन,विसरून देशातील आजच्या फँसिस्टशक्ती, हुकुमशाहीच्या आव्हानांचा मुकाबला केला पाहिजे” असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहून झाली. त्यानंतर सौ. उत्तरा साडविलकर यांनी गायिलेल्या बापूंच्या “ईश्वर अल्लाह तेरो नाम” या भजनानी व साने गुरुजींच्या “खरा तो एकची धर्म,जगाला प्रेम अर्पावे” या सुरेल गीतानी झाली. आपल्या प्रास्तविक भाषणातून प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा, होमकळस यांनी दिवंगत साथी चंद्रकांत खातू स्मृतिस अभिवादन करुन, आठवणी जागविल्या तसेच प्रतिष्ठानच्या मागील वर्षांतील कार्याचा आढावा मांडला. दीपक महाडिक यांनी वक्ते श्री.सुरेश सावंत यांचा परिचय करुन दिला.

कार्यक्रमाला देवरुखचे माजी प्राचार्य डॉ.सुरेश जोशी, निपाणीचे डॉ. चैतन्य शिपूरकर, मंगेश गव्हाणकर, महमंद हुसैन मुसा, चिपळूणचे बापू काणे, डॉ. रेहमत जबले, सौ. रविना गुजर, शाहिर शाहिद खेरटकर, टी.डी.पवार, राजन इंदुलकर, सौ. सुषमा इंदुलकर व शिक्षक, विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती. त्याचबरोबर दिवंगत खातू यांच्या पत्नी श्रीमती स्नेहलता खातू, त्यांचे पुत्र माजी नगरसेवक आशिष खातू, कामगार नेते संदीप पवार, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सुरेश तांबट, शिल्पा रेडीज आदींचा सहभाग होता.

एका महत्वाच्या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित केल्या बद्दल उपस्थितांनी गांधी प्रतिष्ठानला धन्यवाद दिले तर सुरेश जोशी यांनी कार्यक्रमाबाबत व्यक्त होताना ‘आजचा कार्यक्रम हा भावनेला नव्हे तर विचार व त्यातून कृतीला चालना देणारा असा आहे’ असे मत मांडले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जाफर गोठे, सचिव सुनिल खेडेकर, खजिनदार मंगेश वेस्वीकर व सौ. अमृता होमकळस,सौ.सुनिता महाडिक, सौ. छाया व श्री. प्रशांत सातारकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुंदर सूञसंचलन सौ. सई वरवाटकर यांनी तर आभार प्रदर्शन लियाकत शाह यांनी केले. गांधी प्रतिष्ठान द्वारा दरवर्षी चिपळूण मध्ये व्याख्यानाचे आयोजन केले जाते बाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले व प्रतिष्ठान आभार मानले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!