WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

माजी खासदार विनायक राऊत उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर


माजी खासदार विनायक राऊत उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

जि.प. व पं.स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा

रत्नागिरी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत यांचा सोमवार, दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरी जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पक्षाच्या कार्यकारिणींसोबत निवडणूक आढावा बैठका घेण्यात येणार आहेत.

माजी खासदार विनायक राऊत हे पहाटे 4 वाजता कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईहून चिपळूण रेल्वे स्थानकात आगमन करतील. त्यानंतर ते चिपळूणकडे रवाना होणार आहेत. सकाळी 10 वाजता चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 12 वाजता संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे कार्यकारिणी समवेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार असून, दुपारी 2.30 वाजता रत्नागिरी तालुक्यासाठी संपर्क कार्यालय, रत्नागिरी येथे बैठक होणार आहे. यानंतर सायंकाळी 5 वाजता लांजा तालुक्यातील कार्यकर्त्यांशी लांजा संपर्क कार्यालयात संवाद साधण्यात येईल. तर सायंकाळी 7 वाजता राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर श्री. राऊत हे सिंधुदुर्गकडे प्रयाण करणार आहेत.

या दौऱ्यात प्रत्येक तालुक्यातील संघटनात्मक स्थिती, उमेदवार निवड, प्रचार यंत्रणा व स्थानिक प्रश्नांवर सखोल चर्चा होणार असून, आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये या दौऱ्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!