दिल्ली वंदे मातरम् सादरीकरणात शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाचे ५ विद्यार्थी
चिपळूण – दिल्ली राजपथ येथे सोमवारी २६ रोजी होणाऱ्या वंदे मातरम् या प्रजासत्ताक दिनी अंतिम सादरीकरणसाठी राज्यातून निवड चाचणी करण्यात आली. यातून महाराष्ट्र संघात तालुक्यातील खरवते येथील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
यामध्ये ऋषिकेश संदीप जाधव, पार्थ अनिल कदम, येदनेश गणेश म्हात्रे, सोहम सुहास मोरे, साहिल संजय गुरव यांची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. हे विद्यार्थी राजपथावरील संचलनात कोकणचा ठसा उमटवणार आहेत. या राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यामुळे कृषी महाविद्यालयाचे नाव देशपताळवीर झळकले आहे. चिपळूणचे सागर कुंभार सर हे गतवर्षी प्रमाणेच महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजर म्हणून दिल्ली येथे काम पाहणार आहेत. ही बाब कोकणसाठी अभिमानाची राहिली आहे. या महाराष्ट्र संघाला पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, प्राचार्य डॉ. सुमितकुमार पाटील यांच्यासह विविध स्तरातील मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे कौतूक करून त्यांना शुभेच्छा दिल्या











