सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सचिन पवार यांचा सत्कार
चिपळूण : समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपच्यावतीने सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देणारे तिवडी येथील सूत्रसंचालक सचिन पवार यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी चिपळूण येथील त्यांच्या निवासस्थानी पार पडला.
श्री. सचिन पवार हे आपल्या नोकरीची जबाबदारी सांभाळत असतानाही सामाजिक विकास ग्रुपच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतात. समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी ते मोलाचे सहकार्य करत असल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढेही असेच सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या प्रसंगी सामाजिक सेवक संभाजी चव्हाण (माजी सैनिक) तसेच वैभव मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक कार्याबद्दल चर्चा करत समाजहितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.














