डॉ. सुनील भागवत यांनी केली ३५ किमी मॅरेथॉन पूर्ण; मित्रांकडून अभिनंदन
गणपतीपुळे : फिटनेस आणि जिद्दीचे उत्कृष्ट उदाहरण देत डॉ. सुनील भागवत यांनी गणपतीपुळे येथे आयोजित ३५ किलोमीटर मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. कठीण आणि आव्हानात्मक अशा या मॅरेथॉनमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
डॉ. भागवत यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सचिन कदम, प्रसाद आवले, राजा डली, राजा ओतारी तसेच इतर मित्रपरिवारांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने अशा प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेणे महत्त्वाचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.


Views: 243











