WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

बहादूरशेख नाका–चिंचनाका मार्ग राहणार बंद


बहादूरशेख नाका–चिंचनाका मार्ग राहणार बंद

मतमोजणी दिवशी चिपळूण शहरातील वाहतुकीत बदल

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ ची मतमोजणी प्रक्रिया सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार असून, ही प्रक्रिया युनायटेड हायस्कूल, गुरु दक्षिणा हॉल, चिपळूण येथे होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.सदर मतमोजणी केंद्र हे चिपळूण–कराड मार्गावरील मध्यवर्ती व वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत काही मार्गांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत बहादुरशेख नाका ते चिंचनाका रोड तसेच चिंचनाका ते बहादुरशेख नाका या मार्गावरील सर्वसाधारण वाहतूक बंद राहणार आहे. या बंद मार्गासाठी पर्यायी मार्ग म्हणून बहादुरशेख नाका – पावर हाऊस – चिंचनाका तसेच चिंचनाका – पावर हाऊस – बहादुरशेख नाका हा मार्ग वाहनचालकांनी वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच माननीय मंत्री महोदयांच्या दौऱ्याशी संबंधित अधिकृत वाहनांना लागू राहणार नाही. तसेच अत्यावश्यक परिस्थितीत घटनास्थळी तैनात असलेले पोलीस अधिकारी आवश्यक निर्णय घेऊ शकणार आहेत.

ही अधिसूचना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ व ११६(१)(अ)(ब) अन्वये जारी करण्यात आली असून, सदर आदेश पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सही शिक्क्यानिशी निर्गमित केला आहे.

दरम्यान, या तात्पुरत्या वाहतूक बदलाबाबत नागरिकांना काही आक्षेप अथवा हरकत असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे नोंद करावी, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.


614
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!