WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

तेज कुरिअर च्या अश्विनी खेराडे यांचा प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव


तेज कुरिअर च्या अश्विनी खेराडे यांचा प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

१३ वर्षे सुट्टीविना काम, सेवानिवृत्तीला मान्यवरांची उपस्थिती

चिपळूण : येथील घाटगे पाटील घाटगे ग्रुपच्या तेज कुरिअर या संस्थेत १३ वर्षे संगणक ऑपरेटर म्हणून अविरत सेवा देणाऱ्या अश्विनी उर्फ निधी खेराडे यांचा जाहीर सत्कार व निरोप समारंभ उत्साहात पार पडला. प्रांताधिकारी तसेच विभागीय वन अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांच्या कार्याचा गौरव करून सत्कार करण्यात आला.
अश्विनी खेराडे यांनी लहानपणापासूनच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वकष्टाने शिक्षण पूर्ण केले. आई-वडील आणि भावाला आधार देत त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली. शिक्षणाबरोबरच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत त्यांनी स्वतःला सिद्ध केले. विवाहानंतर त्यांनी सासू-सासरे, दीर-जाऊ यांच्याशी अतिशय आपुलकीने वागून खेराडे कुटुंबाचा मान वाढवला. नोकरी आणि संसार यांचा उत्तम मेळ घालत त्या सर्वांसाठी आदर्श ठरल्या. २०१२ पासून त्यांनी घाटगे ग्रुप तेज कुरिअर, चिपळूण येथे संगणक ऑपरेटर म्हणून काम सुरू केले. गेल्या १३ वर्षांत एकाही दिवसाची रजा न घेता त्यांनी संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या प्रामाणिकपणा, शिस्त आणि मेहनतीमुळे त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनल्या.
त्यांचे पती रुपेश खेराडे यांचे अवघ्या ३८ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्या कठीण प्रसंगी घाटगे ग्रुप आणि एसपीएम ग्रुपने त्यांना खंबीर पाठिंबा दिला. एसपीएम शाळेच्या व्यवस्थापन, प्राचार्य आणि शिक्षक वर्गाने मानसिक आधार देत पतींच्या जागी त्यांना संधी देऊन सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. प्रांत अधिकारी आकाश लिगाडे आणि विभागीय वन अधिकारी सौ. गिरिजा देसाई यांच्या हस्ते अश्विनी खेराडे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुढील वाटचालीसाठी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी तेज कुरिअरचे व्यवस्थापक संतोष इनामदार म्हणाले, अश्विनी खेराडे यांनी एका स्त्रीने किती जबाबदारीने कुटुंब आणि नोकरी सांभाळावी याचा आदर्श घालून दिला आहे. संस्थेसाठी त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.”
कार्यक्रमास बांधकाम सभापती कपिल शिर्के,नगरसेवक शशिकांत मोदी, जिद्द मतिमंद शाळेच्या अध्यक्षा सौ. सुमती जांभेकर,यांच्यासह प्रमोद लाड, सौ. सुप्रिया जाधव, सिद्धी जाधव, स्मिता सरदेसाई, सौ. अष्टकला महाडिक, सौ शर्मिला मोरे, अतुल लेले, प्रशांत साळवी, विजय यादव, विरशेष शिंदे, रविना कदम, सौ. श्रुती जोशी, प्रदीप महाडिक, अभय खांडेकर, राजेश भागवत, पद्माकर जावडेकर, अशोक चौधरी, राजेश शिरकर यांच्यासह तेज कुरिअरचे सर्व कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि पाहुण्यांचे स्वागत श्री संतोष इनामदार, व्यवस्थापक, तेज कुरिअर, घाटगे ग्रुप यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


613
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!