WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रत्नागिरी जिल्ह्याला राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत द्वितीय क्रमांक


रत्नागिरी जिल्ह्याला राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत द्वितीय क्रमांक

डेरवण : तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने चिपळूण तालुक्यातील डेरवण क्रीडासंकुलात पार पडलेल्या ३५व्या ज्युनियर राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत सांघिक द्वितीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेत पुमसे दुहेरी प्रकारात भार्गवी पवार व योगराज पवार यांनी सुवर्णपदक मिळवले. सांघिक पुमसे प्रकारात साई सुवारे, श्रुती काळे आणि भार्गवी पवार यांनी रौप्यपदक पटकावले, तर वैयक्तिक गटात साई सुवारे हिने कांस्यपदक मिळवले.

फ्री स्टाईल पुमसे प्रकारात गार्गी बाकलकर हिने सुवर्णपदक जिंकले. तसेच सांघिक फ्री स्टाईल पुमसे गटात साई सुवारे, दिव्या नागर, वेदांत देसाई आणि योगराज पवार यांनी सुवर्णपदक मिळवले. वैयक्तिक गटात तेजस भुवड, दिव्या गुरव आणि रुद्र नलगे यांनी रौप्यपदक प्राप्त केले.

या यशस्वी खेळाडूंना राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रवीण बोरसे, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष वेंकटेशराव करा, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण करा, तसेच शशांक घडशी आणि संजय सुर्वे यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!