WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मुंबईत 3 एप्रिलला जिजाऊ ब्रिगेडचे राज्यस्तरीय महाअधिवेशन


मुंबईत 3 एप्रिलला जिजाऊ ब्रिगेडचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

मुंबई : महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक विचारपीठ म्हणून ओळख असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी राज्यस्तरीय महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे महाअधिवेशन दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे.

या अधिवेशनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून सुमारे एक हजार महिला पदाधिकारी सहभागी होणार असून प्रत्येक जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्त्यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. अधिवेशनात वैचारिक प्रबोधनासह विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षा स्नेहल चव्हाण यांनी केले आहे.

हे महाअधिवेशन चार सत्रांमध्ये पार पडणार असून उद्घाटन समारंभ मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितूताई तावडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा सीमाताई बोके असतील.

अधिवेशनात विविध सुप्रसिद्ध वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पुरुषोत्तम खेडेकर, रेखाताई खेडेकर, विजय घोगरे, नवनाथ घाडगे, चंद्रशेखर शिखरे, स्नेहाताई खेडेकर, मयुराताई देशमुख व निर्मलाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या महाअधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य उपाध्यक्ष अंजलीताई भोसले, मुंबई अध्यक्ष स्मिता देसाई, नवी मुंबई अध्यक्ष भारतीताई पाटील, महासचिव सरिताताई सोमवंशी, कार्याध्यक्ष मनीषाताई देसाई तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष सुनिताताई पाटील व मुंबईतील सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि वैचारिक प्रबोधनासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरणार असून राज्यभरातील महिलांसाठी एक मोठे व्यासपीठ ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.


614
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!