WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव यांची नियुक्ती


भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी
प्रशांत यादव यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा 

सुशांत कांबळे 

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील संघटनात्मक रचनेत महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे प्रशांत यादव यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती जाहीर केली आहे.

रत्नागिरी दक्षिण भागात भाजप संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. प्रशांत यादव यांनी यापूर्वी नगर परिषद तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्ष संघटन मजबूत ठेवत प्रभावी नियोजन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण व परिसरात पक्षाला उल्लेखनीय यश मिळाले होते. बूथस्तरावरील संघटन, कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पक्षाने त्यांच्या कार्यपद्धतीची दखल घेत ही जबाबदारी सोपविल्याचे सांगितले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्तार, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाची ताकद वाढविणे हे प्रमुख उद्दिष्ट त्यांच्या समोर असेल.

नियुक्ती जाहीर होताच चिपळूणसह रत्नागिरी दक्षिण भागात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशांत यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देत आगामी काळात पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रशांत यादव यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यात संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, ही निवड जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!