WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

शाळेलगतच्या कचऱ्याला आग : नागरिकांची धावाधाव


शाळेलगतच्या कचऱ्याला आग नागरिकांची धावाधाव

पाग येथील प्रकार, संभाव्य अनर्थ टळला

चिपळूण : शहरातील पाग येथील मुलांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलगत साचलेल्या कचऱ्याला मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. जवळच विद्युत रोहित्र असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणल्याने संभाव्य अनर्थ टळला.

 

पाग येथील मुलांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील वृक्ष काही महिन्यांपूर्वी तोडण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा पालापाचोळा व इतर कचरा त्याच परिसरात ठेवला होता. मंगळवारी दुपारी अचानक या कचऱ्याला आग लागली. आगीच्या ठिकाणालगतच विद्युत रोहित्र असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना पाग विभाग प्रमुख संदेश गोरिवले यांनी तत्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तत्परतेने आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे मोठा धोका टळला. घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नागरिकांनी अग्निशमन दलाच्या तत्पर कामगिरीचे कौतुक केले.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!