WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूणच्या विकासासाठी आशीर्वाद!


चिपळूणच्या विकासासाठी आशीर्वाद!

नगराध्यक्ष सकपाळ यांची रामदासभाई कदम यांची भेट

खेड : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून चिपळूणचे नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी सोमवारी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, खेडचे माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांची योगिता डेंटल कॉलेज येथे सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान रामदासभाई कदम यांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचा सत्कार केला. तर नगराध्यक्ष सकपाळ यांनी रामदासभाई कदम यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी बोलताना रामदासभाई कदम म्हणाले की, चिपळूण शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देताना आपण कधीही कमी पडणार नाही. “मी स्वतः आहे, माझा एक मुलगा राज्यमंत्री आहे, तर दुसरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे चिपळूणच्या विकासाबाबत कोणतीही चिंता करू नका,” असे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीप्रसंगी बांधकाम सभापती कपिल शिर्के, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, सचिन पेंढारी, निशांत जंगम यांच्यासह श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, ओझरवाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!