लोटेतील डीकेआयसी कंपनीत भिषण स्फोट ५ जण गंभीर
चिपळूण ः लोटे एमआयडीसीतील डीकेआयसी केमिकल कंपनीत गुरूवारी दुपारी 2.30 च्या सुमारास रिअॅक्टरचा भिषण स्फोट झाला. या घटनेत एकूण ९ कामगार जखमी झाले आहेत. यातील गंभीर दुखापत झालेल्या ५ जणांना चिपळूणातील लाइफकेअर व्हॉस्पीटलमध्ये तर किरकोळ दुखापत असलेल्या ४ जणांना लोटे घाणेखुंट येथील परशुराम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्फोट होताच लोटे एमआयडीसीतील अग्नीशमक बंबाच्या साह्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिस तसेच एमआयडीसीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. परिसरातील पदाधिकारी व नागरिकांनी बचाव आणि मदत कार्यात सहभाग घेतला.
Views: 270











