कळंबस्तेत शिवसेना उबाठा गटाला खिंडार
मेटकरवाडीतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
चिपळूण : तालुक्यातील कळंबस्ते (मेटकरवाडी) येथे ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे. गावातील शिवसेना उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार शेखर निकम यांच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत तसेच प्रदेश उपाध्यक्ष शौकतभाई मुकादम यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला असून यामुळे गावात शिवसेना पक्षाला खिंडार पडले आहे.
या पक्षप्रवेशामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आला. प्रवेश करणाऱ्यांमध्ये रघुनाथ भुवड (अध्यक्ष), संतोष शिगवण (उपाध्यक्ष), अंकुश शिगवण (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच), सौ. ललिता मारुती मेटकर (महिला अध्यक्ष), सौ. मनिषा संदीप भुवड (महिला उपाध्यक्ष), सौ. वंदना रामचंद्र भुवड, सौ. नंदिनी नंदकुमार राक्षे (माजी ग्रामपंचायत सदस्या), एकनाथ दत्ताराम भुवड, मारुती मेटकर, संतोष मेटकर, बबन भुवड, सुरेश भुवड, हेमंत भुवड, वसंतदादा मेटकर, सुधाकर शिंदे, प्रदीप शिंदे, अरुण मेटकर, शिवराम मेटकर, दिनेश खापरे, प्रभाकर मेटकर, अरुण खापरे, तुकाराम सकपाळ तसेच महिला कार्यकर्त्या यांचा समावेश आहे.
या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार शेखर निकम व शौकतभाई मुकादम यांनी स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे कळंबस्ते गावात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.












