WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आमदार भास्कर जाधव काय बोलणार?


आमदार भास्कर जाधव काय बोलणार?

🔷शिवसेना उबाठा पक्षाच्या सर्व उमेदवारांचा उद्या सत्कार सोहळा

🔷भाषणाकडे चिपळूणवासियांचे लक्ष

चिपळूण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या पुढाकाराने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने गुहागर विधानसभा मतदारसंघातील विजयी तसेच जिद्दीने लढत देणाऱ्या सर्व उमेदवारांचा सत्कार सोहोळा उद्या मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता चिपळूण येथील बांदल स्कूलच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांसह पराभूत उमेदवारांचाही सन्मान करण्यात येणार आहे. पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा गौरव करून आगामी काळासाठी त्यांना बळ देण्याचा या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणूक निकालानंतर प्रथमच पक्षाचा अधिकृत कार्यक्रम होत असल्याने आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुहागर नगरपंचायत निवडणूक तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतरची पुढील वाटचाल, संघटनात्मक बांधणी आणि आगामी राजकीय रणनिती याबाबत ते मार्गदर्शन करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!