WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सती-चिंचघरी प्राथमिक शाळेकडून ‘जिद्द’ शाळेला अपंग मित्र निधी


सती-चिंचघरी प्राथमिक शाळेकडून ‘जिद्द’ शाळेला अपंग मित्र निधी

चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी–चिंचघरी (सती) ता. चिपळूण जि. रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत ‘अपंग मित्र निधी’ संकलनाचा स्तुत्य उपक्रम राबवून जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेला ३७ हजार ४११ रुपयांची मदत प्रदान केली.

विद्यार्थ्यांमध्ये सहानुभूती व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शाळेने हा उपक्रम हाती घेतला. जिद्द शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे यांनी अपंग मित्र निधी संकलनाची संकल्पना मांडत २०० कार्ड शाळेकडे दिली होती. या कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत निधी जमा केला.

संकलित रक्कम शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ व शिक्षकवृंद यांच्या हस्ते श्री. शिंदे सर व त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. एका कार्डवर २०० रुपयांपेक्षा अधिक निधी जमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिद्द शाळेकडून विशेष प्रमाणपत्र देण्यात आले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांसोबत पालकांचेही मोठे सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण तसेच शिक्षकेतर कर्मचारी विनोद उदेग, एकनाथ चाळके व प्रतिभा तांबिटकर यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!