WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का


रत्नागिरी जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी (१२ मार्च) रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

National Center for Seismology कडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजून १९ मिनिटांनी हा भूकंप नोंदविण्यात आला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.८ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश १६.९२ उत्तर व रेखांश ७३.४४ पूर्व असा रत्नागिरी परिसरात जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले आहे.भूकंपाची तीव्रता कमी असली तरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये नागरिकांना जमिनीला हलका कंप जाणवला. त्यामुळे अनेक नागरिक खबरदारी म्हणून काही काळ घराबाहेर पडले होते.

दरम्यान, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोणतेही नुकसान झाले असल्यास किंवा मदतीची आवश्यकता असल्यास तातडीने आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा.

महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक :
तहसीलदार, चिपळूण तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष : ९६७३२५२०४४

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष : ७०५७२२२२३३

दूरध्वनी : ०२३५२-२२२२३३

पोलीस हेल्पलाईन : ११२

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!