WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला वैचारिक वारसा दिला : प्राचार्य डॉ. माधव बापट


यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला वैचारिक वारसा दिला : डॉ. माधव बापट

चिपळूण : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला एक वैचारिक वारसा दिला. प्रगत विचार, दूरदृष्टी आणि विकासाचा ध्यास घेऊन महाराष्ट्राची पायाभरणी केली. अशा माननीय यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे मत प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी व्यक्त केले. ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, डीबीजे अभ्यास केंद्राच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

डीबीजे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र चालविले जाते. या अभ्यास केंद्रात महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी केंद्र संयोजक प्रा.विनायक बांद्रे, उपप्राचार्य डॉ. चेतन आठवले, उपप्राचार्या सौ.स्नेहल कुलकर्णी, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव, समंत्रक प्रा. विठ्ठल कोकणी, प्रा.अरुण जाधव,प्रा.सौ. तृप्ती यादव, कार्यालयीन कर्मचारी राहुल सावंत आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार केंद्रसहाय्यक कुमारी सिद्धी राणे यांनी मानले.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!