WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्याचा जागर!


जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्याचा जागर!

अपरान्त हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य शिबीर

चिपळूण : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी येथील अपरान्त मल्टिपेशालिटी हॉस्पिटल, चिपळूण यांच्या वतीने महिलांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात महिलांच्या सर्वांगीण आरोग्याची तपासणी करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

‘नेहमीच एक पाऊल पुढे’ या उक्तीप्रमाणे अपरान्त मल्टिपेशालिटी हॉस्पिटल सातत्याने आरोग्यसेवेत नवोन्मेषी उपक्रम राबवत नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करत आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि नियमित आरोग्य शिबिरे यांच्या माध्यमातून रूग्णसेवेबरोबरच प्रतिबंधात्मक आरोग्याच्या संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम हाॅस्पिटल करत आहे. महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये वाढत असलेल्या विविध आजारांच्या पार्श्वभूमीवर हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या मोफत आरोग्य शिबिरामध्ये बी.एम.आय. (BMI) टेस्ट, बी.एम.डी. (BMD) टेस्ट, ब्लड प्रेशर तपासणी, ब्लड शुगर तपासणी तसेच ई.सी.जी. (ECG) तपासणी अशा महत्त्वपूर्ण चाचण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय स्त्रीरोग तज्ज्ञांकडून महिलांच्या मासिक पाळीतील तक्रारी, स्तनातीलगाठ, गर्भधारणा संदर्भातील मार्गदर्शन, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOD), अँनिमिया तपासणी व समुपदेशन केले जाणार आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब, हृदयविकार, श्वसन विकार, डायबेटीस आणि थायरॉईड संदर्भातील मार्गदर्शन व तपासणी होणार आहे. अस्थिरोग तज्ज्ञांकडून सांधेदुखी, मणक्याचे त्रास आणि हाडांची झीज (ऑस्टिओपोरोसिस) याबाबत सल्ला दिला जाणार असून, बी.एम.डी. चाचणीद्वारे हाडांची घनता तपासली जाणार आहे.
आहार तज्ज्ञांकडून योग्य आहार पद्धती, वजन नियंत्रण आणि जीवनशैलीतील आवश्यक बदल याविषयी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरादरम्यान सोनोग्राफी, एक्स-रे आणि रक्त तपासणीवर विशेष ३० टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

हे शिबीर सावित्री एनक्लेव्ह, एल.आय.सी. ऑफिस समोर, भोगाळे, चिपळूण येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी ७९९८८९८९८९/, ८९९८७३७३७३/ WhatsApp No.८३८०८६०१३६ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपरान्त हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेले हे शिबीर महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

 

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!